जळगाव। भाजपा स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रीय स्वयंसंघाचे ज्येष्ठ स्वयसेवक कै. नारायणराव मराठे यांच्या स्मरणार्थ भाजपा मंडळ क्र. 1 तर्फे छत्रपती शिवाजी महाराज बस थांबाजवळ पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष शौर्य यांच्या हस्ते व महेश जोशी, विशाल त्रिपाठी, शिवदास साळुंखे, राजेंद्र घोगे पाटील, संजय शिंदे, सरचिटणीस सरिता नेरकर, ज्योती राजपूत, सना जाहागीर खान, महिला अध्यक्ष जयश्री पाटील राजेंद्र मराठे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, सुशिल भावसार, दिनेश जाधव, सुनिल जाधव, प्रभाकर तायडे, सरिता नेरकर, निलेश पवार, निशांत पाटील, राहुल तिवारी, शेखर खान, मधुकर मराठे, वसीम खान, संदीप पाटील, अशोक हक्कीम, सुभाष सांगोरे, राजु भोई, दिलीप नासरकर, आंबा क्षिरसागर, भालेराव, शंभु जोगी, विजय निंबाळकर, अमोल नेरकर, उमेश मोघे आदी उपस्थित होते.
50 हजार भीम अॅप डाउनलोड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर चलनातील नोटा बंद करण्यात आल्या. त्यामुळे जनतेला व्यवहार करण्यासाठी सुलभ यंत्रणा निर्माण व्हावी म्हणून भीम अॅपची निर्मिती करण्यात आली. भाजपा कार्यकर्ते ग्रामीण भागातील जनतेपर्यंत 50 हजार भीम अॅप सप्ताहातंर्गत पोहोचविणार आहेत.
ध्वजवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात
भाजपा स्थापना दिनानिमित्त भाजपा जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे ध्वज वंदन करण्यात आले. याप्रसंगी मनपा विरोधी पक्ष नेते वामनदादा खडके यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आले. तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्यय यांच्या प्रतिमेचे पूजन मनपा गटनेते सुनील माळी, सरचिटणीस दीपक सुर्यवंशी विशाल त्रिपाठी यांनी केले. याप्रसंगी डॉ. सुरेश सुर्यवंशी, सुनील नारखेडे व दीपक सूर्यवंशी यांनी पक्षस्थापनेपासून आतापर्यंतचा आढावा घेतला. युवामोर्चातर्फे भीम अॅपबाबत प्रदेश युवा सरचिटणीस गीतांजली ठाकरे यांनी दिली. महानगरातील 9 मंडळामध्ये दिवसभर विविध लोकहितार्थ व जनहितार्थ कार्यक्रम घेण्यात आले यात शिवाजी नगर येथे पाणपोईचे उद्घाटन, आधार कार्ड, पॅन कार्ड, फळ वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.
यांची होती कार्यक्रमाला उपस्थिती
याप्रसंगी विशाल त्रिपाठी, शिवदास साळुंखे, महेश जोशी, सुभाष शौचे, उज्वला बेंडाळे, नितीन इंगळे, राजू घुगे, वंदना पाटील, नितीन गायकवाड, मनोज भांडारकर, संजय शिंदे, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, विजय गेही, पिंटु काळे, भगत बलानी, ज्योती चव्हाण, उज्वला बाविस्कर, जयश्री पाटील, जितेंद्र मराठे, ज्योती निभोरे, ज्योती राजपुत, सना खान, निर्मला सपकाळे, पुष्पलता उबने, राजू मराठे, कपिल पाटील, प्रा. जीवन अत्तरदे, विनोद मराठे, महेश ठाकूर, राहुल वाघ, प्रदीप रोटे, किशोर भंडारी, प्रभाकर कोल्हे, भगतसिंह पाटील, दिलीप नाझारकर, सुनील जाधव, दीपक पवार, नितीन सपके, निशिकांत मंडोरा, केशव नारखेडे, कारण जावळे, चंद्रशेखर महालेआदी उपस्थित होते.