फरिदापूर: उत्तराखंडमधील भाजपा नेते अरविंद पांडे यांच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. अंकुर पांडे असे त्याचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात हा अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. ट्रकला धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
फरिदापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग २४ वर हा भीषण अपघात झाला. अंकुर पांडे प्रवास करत असलेल्या कारने ट्रकला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजून दोघांचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण गोरखपूर येथे एका लग्न समारंभारत उपस्थित राहण्यासाठी चालले होते. अरविंद पांडे हे भाजपाचे मंत्री असून उत्तराखंड सरकारमध्ये शाळा व संस्कृत शिक्षण, क्रिडा, युवा कल्याण आणि पंचायती राज मंत्री आहेत.