नक्षली हल्ल्यात भाजप आमदार ठार; पाच जवान शहीद

0

छत्तीसगढ: राज्यातील दंतेवाडा परिसरात आज नक्षलवाद्यांनी भाजप आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये भाजप आमदार भीमा मंडावी आणि पोलीस दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली होती. मात्र, तरीही नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून ताफ्यातील गाडी उडवली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, वाहनांचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. हा ताफा भाजप आमदार भीमा मंडावी यांचा होता. भीमा मंडावी हे सभा आटोपून येत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात आमदार मंडवी यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनाचीही हानी झाली. त्यामध्ये छत्तीसगढ पोलीस दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला.