नवी दिल्ली- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि कॉंग्रेसला पर्यायी म्हणून तिसरी आघाडी तयार व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट चंद्रशेखर राव घेत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतल्यानंतर ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे.
या अगोदर देखील त्यांनी यामुद्द्यावर ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केलेली आहे. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची देखील त्यानी भेट घेतली आहे.
भाजपने काही पक्षांना सोबत घेऊन आघाडी केली आहे, तर कॉंग्रेस महाआघाडी करत आहे. या दोन्ही आघाड्यांना आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडीची तयारी होत आहे.