लखनऊ-उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये कथित गो-हत्येच्या संशयावरून झालेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून संपूर्ण देश हादरले होते. दरम्यान आता एका भाजप नेत्याने एका पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बुलंदशहराची पुनरावृत्ती करण्याची धमकीही त्याने दिली आहे. एक ऑडियो रेकॉर्डींग व्हायरल होत आहे. त्यात भाजप नेता एका पोलीस निरीक्षकाला धमकी देत असल्याचे उघड झाले आहे.
हापुड येथील भाजपचा जिल्हा मंत्री प्रमोद जिंदल असे त्याचे नाव आहे. पोलीस स्टेशनला फोन करत त्याने धमकी दिली आहे.