भाजप पिछाडीवर असल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप; ५०० अंकांनी सेन्सेक्स खाली

0

मुंबई – मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपा पिछाडीवर पडल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, सेंसेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला आहे. तर दिवसाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे.

दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला कालही शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. सोमवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यावर मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील सूचकांक असलेल्या सेंसेक्समध्ये मोठी पडझड झाली. भागधारकांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेंसेक्स ६०९.५८ अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही १८७ आंकांनी घसरण झाली होती.