मुंबई: भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातंर्गत येणाऱ्या प्रसारभारती मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाने काही दिवसांपूर्वी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली होती. यातून प्रदेश कार्यकारिणीच्या खनिजदार असलेल्या शायना एनसी यांना वगळण्यात आले होते. मात्र, त्यानंतर शायना एनसी यांना प्रसार भारती मंडळाच्या सदस्यपदी नेमण्यात आले आहे. शायना एनसी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती व प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत.