पिंपरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खराळवाडीत पिंपरी – चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी रवि लांडगे व मोरेश्वर शेडगे यांनी आधुनिक विचारवंत सावरकर यांचे देशप्रेम या विषयावर विचार मांडले.
या प्रसंगी धनंजय शाळीग्राम, भाजयुमोचे प्रवीण सिंग, देवयानी भिंगारकर, अजित कुलथे, सचिन राऊत, दिपक नागरगोजे, भुषण गायके, पवन जाधवार, राहुल शिंदे, मंगेश धाडगे, सोनल वर्मा, गणेश संभेराव, पंकज वेंगर्लेकर, महेश कंद, संभाजी नागरगोजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.