भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

0

महापुरूषांच्या पुतळा विटंबनेच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलन

देहूरोड : देशभरात महापुरूषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचे प्रकार सुरू असताना भाजप सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही, असा आरोप करून येथील फुले-शाहु-आंंबेडकर विचारमंचच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

महापुरूषांच्या पुतळ्यांच्या विटंबना करणार्‍यांना कुठल्याही प्रकारे पाठीशी घातले जाऊ नये. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी येथील ऐतिहासिक सुभाष चौकात पुतळा दहन आंदोलन केले. यावेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, विजय मोरे, किरण कांबळे, मेघराज तंतरपाळे, रेणू रेड्डी, विजय गायकवाड, राजकुमार कलीमुर्ती, इक्बाल शेख, आदी उपस्थित होते.

सरकार ठोस पावले उचलत नाही
अलीकडच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलीबुर्गी यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या सरकारी यंत्रणा अजुनही त्यांच्या मारेकर्‍यांपर्यंत पोहचू शकली नाही. कोरेगाव भीमा येथे दंगल घडवून आणल्याबद्दल आरोप असणार्‍यांना सरकार अटक करत नाही. आणि विजयाच्या उन्मादात जातीवादी शक्तींकडून महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते तरी सरकार ठोस पावले उचलत नाही. अशी खंत यावेळी तंरपालळे यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यलकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.