भाजप सरकार पैशांच्या जोरावर निवडणूक लढवतेय

0

शक्ती अ‍ॅप व जनसंपर्क अभियान माहिती पुस्तिकेचे उदघाटन

फैजपूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे जनसंपर्क अभियान माहिती पुस्तक व शक्ती अ‍ॅपचे उद्घाटन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते मंगळवारी शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात यावल-रावेर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या उपस्थित करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप भैय्या पाटील होते. माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, 60 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने देशाचा लोकहिताचा निर्णय घेत विकास केला आहे आणि चार वर्षांच्या काळात भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असून त्याचा जाब जनतेने विचारला पाहिजे. भाजपा सरकारने पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे स्वप्न पाहू नये कारण जनता चार वर्षात होरपळली आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. दिवसभर ‘दादा’ व रात्री ‘भाऊ’ असे गुणगान करणार्‍या दुटप्पी कार्यकर्त्यांचा शोध सुरू असून त्यांचा योग्य वेळी समाचार घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैया पाटील, माजी आमदार नीळकंठ फालक, मसाका चेअरमन शरद महाजन, जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन राजीव पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुन्वर खान यांनी आपले मनोगत व्यक्त करून काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढविला. शक्ती अ‍ॅपबाबतची माहिती चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सांगोरे कार्यकर्त्यांना दिली.व्यासपीठावर मधुकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भागवत पाटील, यावल तालुका संघाचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, जिल्हा परीषद काँग्रेस गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, रावेर काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, डॉ.सुरेश पाटील, दिलरूबाब तडवी, उपनगराध्यक्ष कलिम खा मण्यार, माजी पंचायत समिती सभापती लीलाधर चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती केतन किरंगे, यावल काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, फैजपूर शहराध्यक्ष सैय्यद कौसर, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, अकिल शेठ, जावेद जनाब, प्रभात चौधरी, प्रा.डॉ.व्ही.आर.पाटील, प्रा.डॉ आर.एल.चौधरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी तर आभार ज्ञानेश्वर महाजन यांनी मानले.