भाजयुमोची आढावा बैठक

0

चाळीसगाव। भारतीय जनता युवा मोर्चाचे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांचे उत्तर महाराष्ट्र विभागीय जिल्हाध्यक्ष, युवती प्रमुख, सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, सरचिटणीस आमदार उन्मेश पाटील, अमोल जाधव व जिल्हा पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणादेवी येथे उत्साहात पार पडली. बैठकीचे उद्घाटन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. युवा मोर्चाने राज्याला व देशाला अनेक नेते दिले असल्यामुळे कार्यकर्त्यांना काम करण्याची मोठी संधी यामुळे प्राप्त होते. तरी पुढील कालावधीत अधिक जोमाने कामाला लागून संघटना वाढवावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष टिळेकर यांनी केले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
आमदार उन्मेश पाटील यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, युवा मोर्चा हा भाजपाच्या रक्तवाहिन्या असून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. येणार्‍या काळात पक्षातर्फे विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती यावेळी दिली.सरचिटणीस अमोल जाधव, गितांजली ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले तर जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. चिटणीस गितांजली ठाकरे, विनोद दळवी, सचिन हांडगे, राजेश घुगे, पंकज जैन, प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्नील लोकरे, जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, शहराध्यक्ष अक्षय मराठे व जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.