चाळीसगाव। भाजयुमोच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यासाठी उपस्थित भाजयुमोच्या प्रदेश सर चिटणीस गीतांजली ठाकरे यांचा कोळी महासंघ व भाजपच्या वतीने चाळीसगाव येथे सत्कार करण्यात आला. शहरातील घाट रोड वरील कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अण्णा कोळी यांच्या कार्यालयात गीतांजली ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.
चाळीसगाव येथील सत्कार प्रसंगी यांची होती उपस्थिती
कोळी महासंघाच्या तालुकाध्यक्षा चित्राताई कोळी व कला ताई कोळी यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले तर अण्णा कोळी भाजपचे विवेक चौधरी, शेषराव पाटील, अरुण पाटील, राजेंद्र पगार, राजेंद्र मांडे, सचिन स्वार, किरण पोतदार, रुपेश पाटील, यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी जिभाऊ आधार पाटील, नाना कोळी, संतोष कोळी, चुनीलाल पहेलवान, सुभाष कोळी, अस्लम मिर्झा, नूर मौलाना, बापू गुरुजी, सलील शेख, दिलीप झोडगे, दिनकर बापू, भूषण चौधरी, कैलास मोरे, सिद्दार्थ कोळी, शिवाजी कोळी, संजय कोळी, राहुल कोळी, भाऊसाहेब कोळी, बाप्पू अहिरे, सुभाष चौधरी या वेळी उपस्थित होते.