पिंपळनेर। येथील स्वामी विवेकानंद वाचनालयात भारतीय जनता युवा मोर्चा, साक्री तालुका व पिंपळनेर शहराची आढावा बैठक दिनांक 15 जुलै रोजी घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्य. सदस्य ऍड.संभाजीराव पगारे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भा.ज.यु.मोर्चाचे धुळे जिल्हा प्रभारी पंकज जैन, भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष राम भदाणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव,जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप कोठावदे, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव,सरचिटणीस रामकृष्ण एखंडे, भाज यु.मो. तालुकाध्यक्ष डॉ.देवेंद्र देवरे, तालुका सरचिटणीस भटु निकुंभ, पिंपळनेर शहराध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, भा.ज.यु.मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश पगारे, शैलेंद्र आजगे के.आर.राऊत, किरण शिणकर उपस्थित होते.
बैठकीच्या यशस्वितेसाठी भाजयुमो पिंपळनेर शहराध्यक्ष कल्पेश नेरकर, सरचिटणीस राहुल सोनवणे सागर महिरे, योगेश सुर्वे, गणेश वसाने, दिपु शहा, सिद्द्केश भावसार, मनु अहिरे, पंकज वानखेडे, व युवा मोर्चाच्या आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.