चाकण : चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावलेल्या तरुणाला दोघांनी मारहाण केली. तसेच त्याला कोयत्याने मारण्याची धमकी दिली. ही घटना खराबवाडीमधील धाडगे आळीमध्ये शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. शाम नामदेव पवार (वय 22, रा. चाक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अकबर नजीर काझी, अजमुद्दीन नजीर काझी (धाडगेआळी, खराबवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे चाकण परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी शनिवारी धाडगेआळीमध्ये भाजीपाल्याचे दुकान लावले. त्यांच्या दुकानाच्या शेजारी आरोपी काझी याचे चिकनचे दुकान आहे. चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावायचे नाही, असे म्हणत अकबर याने पवार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच अजमुद्दीन याने ‘तू जर इथे दुकान लावले, तर तुला सोडणार नाही’ असे म्हणत कोयत्याने मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.