भाजे संपर्क येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

लोणावळा । संपर्क संस्था भाजे मळवली व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय आयोजित सर्व निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. जागतिक महिला दिनानिमित्त संपर्क संस्था भाजे मळवली व माइर्स एम.आय.टी. पुणे संचालित एम.आय.एम.इ.आर. मेडिकल कॉलेजचे डॉ. भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपर्क दवाखाना मळवली येथे पार पडले. या शिबिरात हाडांची तपासणी, शल्यचिकित्सा, कान, नाक, घसा तपासणी, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग निदान, दंतरोग व चिकित्सा नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या.

ग्रामीण भागातील 500 महिलांनी घेतला लाभ
यावेळी 500 रुग्णांनी तपासणी करून घेतली ग्रामीण भागातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संखेने या शिबिराला उपस्थित होत्या. यावेळी कै.दिनेश बाळासाहेब हुलावळे याच्या स्मरणार्थ शिवमावळा ग्रुपच्या वतीने अल्पोहार देण्यात आला. संस्थेच्या वतीने रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले तसेच लहान बालकांना भेट वस्तू देण्यात आल्या. या शिबिराला मायमर्स मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेन्द्रप्रसाद गुप्ता तसेच इतर 20 डॉक्टर्स चे सहकार्य लाभले. संपर्कचे अमितकुमार बँनर्जी व सर्व डॉक्टर व उपस्थितांचे स्वागत केले.

मान्यवरांची उपस्थिती
शिबिराला पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, माजी जि.प.सदस्या गंगा कोकरे, देवलेचे माजी सरंपच निकीता आंबेकर, भाजेच्या माजी सरपंच अलका पवार, भाजेचे उपसरपंच चंद्रकांत साठे, शैला उबाळे, तुषार महाराज दळवी, रामभाऊ ढगे, प्रांजल भलारे हुलावळे, शुभांगी केदारी, अनिल दळवी, विशाल विकारी यांनी भेट दिली. यशस्वीतेसाठी संपर्क अभिनव पतसंस्थेच्या सर्व संचालिका तसेच संपर्क संस्था सर्व कर्मचारी वर्ग संपर्क दवाखाना डॉक्टर्स यांनी विशेष परिश्रम घेतले.