शिरपूर। शिरपूर तालुक्यातील भाटपुरे येथील गावातून तसेच तेथील तांडे वस्तीतून जाणार्या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह बदलून शिरपूर पॅटर्न अंतर्गत तयार करण्यात आलेल्या दोन बंधार्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी विशेष अतिरिक्त जलपुनर्भरण कामाचे भूमिपूजन शिरपूरच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. भाटपुरे गावाच्या नाल्याचे पाणी दरवर्षी गावातून व तांडे वस्तीतून जावून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पावसाचे पाणी 30 ते 40 एकर शेतातून वाहून पिकांचे नुकसान होत होते. यानाल्याच्या पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी जेसीबी मशिनच्या साहाय्याने कामास सुरुवात करण्यात आली. हा नाला गावातून न जावू देता त्याचे पाणी शिरपूर पॅटर्न अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या दोन बंधा-यांमध्ये सोडण्यात येणार आहे.
शिरपूर पॅटर्न अंतर्गत विशेष अतिरिक्त जलपुनर्भरणाचे काम
या विशेष अतिरिक्त जलपुनर्भरण कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जि.प.सदस्य शांताराम फुले, माजी पं.स. सदस्य प्रकाश चौधरी, प्रकाश पाटील, शामकांत करनकाळ, सरपंच शैलेंद्र चौधरी, उपसरपंच निर्मलाबाई भिल, जे.टी.पाटील, ग्रा.पं.सदस्या सिंधुबाई कोळी, मंदोर राठोड, आक्काबाई बंजारा, सरलाबाई भिल, विमलबाई चौधरी, लताबाई शिरसाठ, रोशन सोनवणे, शिवाजी भिल, सावित्रीबाई राठोड, पंकज जैन, विनोद जैन, गोटू मोरे,स्वीय सहाय्यक सुनिल जैन आदी उपस्थित होते.