भाटीया समाजातर्फे गुणवंताचा आज सत्कार

0

जळगाव। जिल्ह्यातील भाटीया समाज गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थींनी सत्कार समारंभ कार्यक्रम व स्नेह-संमेलन 6 रविवार रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन जळगाव याठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत. अशा दाम्पत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

याप्रसंगी आमदार राजुमामा भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, अध्यक्ष किशोर भाटिया, लक्ष्मीदास भाटीया, अशोक आसर, मंगलदास भाटिया, गुजराथी छायाबेन भाटीया, मनिषा दलाल, समिती प्रमुख विजय भाटीया, मिनेष दलाल, रितेश भाटिया यांची उपस्थिती राहील. तरी जिल्ह्यातील भाटीया समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकवर्गाने जिल्हा पत्रकार संघात उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा भाटिया समाज संस्थेतर्फे करण्यात आले आहे.