भातखंडे येथील शिक्षक पाटील यांना गुरु गौरव पुरस्कार

0

भडगाव : तालुक्यातील भातखंडे येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ शिक्षक बी.एन.पाटील यांना महात्मा ज्योतीराव फुले स्मृती दिन या शिक्षक दिनानिमित्ताने तसेच म.फुलेंच्या 125 व्या स्मृती शताब्दी वर्ष निमित्ताने ओ.ई.सी. विद्यार्थी शिक्षक-पालक विकास असोसिएशन, धुळे यांच्यातर्फे गुरु गौरव पुरस्कार 2016 ने सन्मानीत करण्यात आले. पुरस्कार वितरण धुळे येथील धो.शा.गरुड वाचनालय या ठिकाणी करण्यात आले.

पुरस्कार वितरणानंतर शाळेत त्यांचा सत्कार
शिक्षक बी.एन.पाटील यांनी गेल्या 25 वर्षापासून शैक्षणिक सेवा बजावत असतांना विद्यार्थी हित जोपासले त्यात ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मागासलेपण असेल ते त्यांना शोधते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पालक भेटी केल्या. प्रसंगी जादा तास तसेच अनेक असे उपक्रमात सहभाग त्यात अंधश्रद्धा निर्मुलन, पल्स पोलीओ, वृक्षारोपण या अन्य विषयात त्यांनी सहभाग घेऊन उदबोधन केले त्यांच्या कामाची दळवळवरील संघटनेच्या समीतीने घेतली त्यातून त्यांची निवड करण्यात आली. पुरस्कार वितरणानंतर शाळेने त्यांच्या सत्कार केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जी.जे.पाटील हे होते. या वेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एन.यू.देसले, शिक्षक एस.एन.सोनवणे, संदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. पाटील यांना गुरु गौरव पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.