भातखंडे येथे राज्यस्तरीय पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार

0

भातखंडे । भातखंडे विद्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स राज्य संस्थेतर्फे सन 2016-2017 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस् राज्य प्रशिक्षण केंद्र सोनगीर जि. धुळे येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात शाळेचे आठ विद्यार्थी पात्र झाल्याने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्याची निवड झाली. या निवडीबद्दल स्काऊट शिक्षक एस.एन. सोनवणे, संदीप पाटील, संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जी.जे. पाटील व संस्थेचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी व भातखंडे गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी हार्दिक अभिनंदन केेले आहे.