भातखंडे विद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

0

भातखंडे । येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात महात्मा फुले व हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी.जे.पाटील हे होते.

महात्मा फुलेच्या प्रतिमेचे पुजन करुन शाळेतील जेष्ठ शिक्षक बी.एन.पाटील यांनी महात्मा जोतीराव फुले यांचे जिवन चरित्र सांगितले. कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बी.एन.पाटील यांनी केले.