भातखेड्याच्या वर्‍हाडाच्या वाहनाला अपघात ; सहा आदिवासी जखमी

0

यावल- तालुक्यातील कुंड्यापाणी येथील लग्नाचे मूळ घेऊन परतणार्‍या वर्‍हाडी मंडळींचे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्यावर जाऊन चढल्योन सहा आदिवासी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी नावरे फाट्यावर घडली. जखमी भातखेडा, ता.रावेर येथील रहीवासी आहेत.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
रावेर येथील आदिवासी तडवी समाजाचे लग्नानंतरचे मूळ घेण्यासाठी वर्‍हाडी मंडळी कुंड्यापाणी येथून गेली होती. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आयशर (एम.एच.12 सी.एच 4767) वाहनाने प्रवास करीत असताना वाहनाला अपघात झाला. या अपघातात सुहाना संजीव तडवी (16), हसनूर फिरोज तडवी (17), कबीर तडवी (18), साहिल निजाम तडवी, सद्दाम सुपड तडवी (20), रज्जाक इमाम तडवी (22) हे जखमी झाले. वाहनाचा अपघात होताच नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने साखळी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ.फिरोज तडवी व कर्मचार्‍यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. जखमींपैकी रज्जाक तडवी गंभीर जखमी असून डोळ्यांमध्ये गरम इंजिन ऑईल पडल्याने त्यांच्या डोळ्यांना ईजा झाली तसेच डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली. अपघाताचे वृत्त कळताच नागरीकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.