भादलीत दारूबंदीसह अवैध धंदे बंदचा ठराव

0

भादली बु.॥- ग्रामपंचायतीची नुकतीच ग्रामसभा होवून त्यात गावात दारू बंदी करण्यासह अवैध धंद बंद करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला तसेच नशिराबादच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याबाबत निवेदनही देण्यात आले. गावात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बोकाळले असून दारू पिणार्‍यांच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचा अर्ज ग्रामसभेत सादर झाल्यानंतर त्याबाबत ठराव करण्यात आला. ठरावावर सरपंच उज्ज्वला सुनील बाविस्कर यांच्यासह ग्रामसेवकांची स्वाक्षरी आहे.