रावेर। भादली बु. येथील भोळे कुटूंबीयांची निर्घुण हत्या करणार्या नराधमांना अटक करावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींवर कठोर शिक्षेची मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी घनशाम पाटील, योगेश महाजन, राजेंद्र चौधरी, योगेश पाटील, नरेंद्र वाघ, विनोद पाटील, विष्णु महाजन, दिलीप पाटील, अनिल पाटील, मुकेश महाजन, मंदार पाटील उपस्थित होते.
अॅड. निकम यांची नियुक्ती करा
या हत्याकांडास तीन ते चार दिवस उलटूनही पोलिसांना कोणतेही धागे दोरे हाती लागले नाही. यासाठी सरकारी वकिल अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती या प्रकरणात करावी, तसेच या नराधमांचे वकिलपत्र कोणीही घेऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.