भादवड राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियान आजपासून

0

नंदुरबार । केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भादवड येथे जनतेला आरोग्याची तसेच सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती व्हावी यासाठी प्रजनन, माता, नवजात शिशु, बाळ आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्यविषयी येत्या दिनांक 02 व 03 मार्च 2017 रोजी जि प प्राथमिक शाळेच्या प्रांगणात विशेष जनसंवाद व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 02 मार्च रोजी भादवड येथे महिला-मुलीसाठी रांगोळी स्पर्धा, सुद्रुढ बालक स्पर्धा आणि शालेय विद्यार्थ्यासाठी दौड स्पर्धा घेण्यात येणार आहेत, आणि किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याविषयी तालुका अधिकारी डॉ संजय वळवी मार्गदर्शन करतील तसेच गावातील जनतेला आरोग्याची माहिती देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी विविध जनजागृतीचे लघु चित्रपटही दाखविण्यात येणार आहे.

दिनांक 03 मार्च रोजी सकाळी 9 वाजता भादवड गावात आरोग्य जनजागृती प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. या प्रचार फेरीमध्ये पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास जि.प अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी जी एस मंगळे, विभागीय प्रचार अधिकारी पराग मांडले, पं.स सभापती सविता गावित, जि.प सदस्य हेमा गावित, पं.स उपसभापती दिलीप गावित,
सरपंच संजय वळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर बी पवार, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, तालुका अधिकारी डॉ संजय वळवी, पळसून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश वळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात आई-बाळाचे आरोग्य, किशोरवयीन मुलांचे आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान या विषयावर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यां कार्यक्रम दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यां दोन दिवसीय कार्यक्रमात विविध विभागांचे योजनांची माहिती चित्र प्रदर्शनी लावण्यात येणार आहेत. अशी माहिती भारत सरकाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अमरावती येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रमुख अंबादास यादव यांनी दिली.