भानखेडामधील 24 वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

A 24 Year Old Married Woman Committed Suicide by Hanging Herself in Bhankheda बोदवड : तालुक्यातील भानखेडा येथील 24 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, 13 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. भारती योगेश उगले (24, भानखेडा, ता.बोदवड) असे मयताचे नाव आहे.

मुलगी घरी असताना घेतला गळफास
भारती उगले या विवाहितेच्या पतीचा वर्षभरापूर्वी मुक्ताईनगर येथे अपघाती मृत्यू झाल्यानंतर विवाहिता माहेरी भानखेडा येथे चार वर्षीय मुलीसह आली होती. मंगळवारी दुपारी विवाहिता व तिची मुलगी घरी असताना विवाहितेने लोखंडी पाईपाला ओढणीने गळफास घेतला. या प्रकरणी नरेंद्र जगन्नाथ देशमुख (49) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास सचिन चौधरी करीत आहे.