‘भाभीजी घर पे है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

मुंबई : ‘भाभीजी घर पे है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिल्पा शिंदेने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिल्पा शिंदे बिग बॉसच्या दहाव्या पर्वाची विजेती ठरली होती.

बिग बॉस जिंकल्यानंतर शिल्पा शिंदे सुनील ग्रोव्हरच्या क्रिकेटवर आधारित वेब सीरिज ‘जिओ धन धना धन’ मध्ये झळकली होती. सुनीलची पत्नी गुगली देवीची भूमिका तिने निभावली होती.

शिल्पा शिंदेचा जन्म 28 ऑगस्ट 1977 रोजी झाला आहे. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय घरात तिचा जन्म झाला. तिचे वडील डॉ सत्यदेव शिंदे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. शिल्पाच्या वडिलांना तिने कायद्याचं शिक्षण घ्यावं अशी इच्छा होती. पण शिल्पा शिंदेला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यांनी शिल्पाला एक वर्ष दिलं होतं. आणि तिनेही संधीचं सोनं करत यशस्वी अभिनेत्री झाली.