निजामपुर। साक्री तालुक्यातील भामरे गावातील आदिवासी शेतकर्यांच्या गोर गरीब नागरिकांच्या शेतजमीनी ह्या भूमाफीया दलाल व सरकारी अधिकार्यांना हाताशी घेऊन जमीन हडप करून शेतकर्यांना भूमिहिन केले आहे तसेच करीत असून यातून शेतकर्यांचा संसार उद्ध्वस्त करत आहे. तरी या शेतजमिनी पुन्हा आदिवासींच्या ताब्यात देण्याची मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उप विभागीय अधिकार्यांना निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्त्या मनिषा पाटील यानं करण्यात आली आहे. याप्रसंगी सुका झुल्या बोल(भील), पुनाबाई गोविंदा पवार(भील), हिरामण नारायण अहिरे (भील), भिला पुना भामरे, मोहन सिताराम वाघ आदी उपस्थित होते.
सौर उर्जा कंपन्यांनी शेतकर्यांची दिशाभूल व फसगत केल्याचा आरोप
सौर उर्जा कंपनी यांनी तमाम शेतकर्यांची दिशाभूल व फसगत चालवली आहे. यामुळे साक्री तालुक्यांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. सौर उर्जा कंपनी यांनी तमाम शेतकर्यांची दिशाभूल व फसगत चालवली आहे. यामुळे साक्री तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. गरीब नागरिकांचे जिवन उद्ध्वस्त करणारे पवन उर्जा कंपनीचे प्रतिनिधींनी आदेशाचे पालन केलेले नाही. पवन उर्जा कंपनीचे प्रतिनिधीनींना आजतागायत निदेर्शनांचे पालन केलेले नाही. ही कंपनी कायद्याचे पालन करीत नाही. आदिवासी भागातील नागरिकांची सर्रास पिळवणूक व अवहलेना चालविले आहे. आदिवाशी शेतकर्यांना आत्महत्या करणास भाग पाडू नका असा इशारा देण्यात आला आहे. आदिवासी बांधवंवर जो अन्याय अत्याचार चालविला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. आमच्या जमिनी परत मिळाव्यात व आम्हा समस्त आदिवासी बांधवांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.