निंभोरा बु., ता.रावेर- कुटुंबातील वाटणीला विवहिता जवाबदार असल्याचा ठपका ठेवत सासरच्यांनी छळ केल्याने त्यास कंटाळून भामलवाडीच्या विवाहितेने जाळून घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर तालुक्यातील शीतल राजेंद्र पाटील (वय 27) या विवाहितेला कुटुंबातील वाटणीला जवाबदार धरत आरोपींनी छळ केल्याने या विवाहितेने आत्महत्या केली.
या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात पोपट विश्वनाथ सोनोने (रा.जांभूळधाबा, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी तथा पती राजेंद्र दामू पाटील, सासू जैवंताबाई दामू पाटिल, समाधान दामू पाटिल, मनिषा समाधान पाटील (भामलवाडी) तसेच शोभाबाई किशोर पाटील (नांदूरखेडा, ता.रावेर) यांच्याविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रकाश वानखडे , फौजदार ज्ञानेश्वर पाकडे, हवालदार सुनील वंजारी, ईश्वर चव्हाण, राकेश वराडे करीत आहे. दरम्यान, मयत विवाहितेस नऊ महिण्यांची लहानगी मुलगी असल्याने भामलवाडीसह जांभूळधाबा गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.