येरवडा : जनतेच्या विविध विकासकामाबरोबरच पाणीप्रश्न सोडविण्यासाठी वेळप्रसंगी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिला. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील व ग्रामीण भागास पाणीपुरवठा व्हावा. या उद्देशाने भामा आसखेड येथून पाणी योजनेस मंजुरी असताना देखील हे काम गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याच्या निषेधार्थ चंदननगर येथील टाटा गार्डन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्या जाधव, संजिला पठारे, सुमन पठारे, महादेव पठारे, बाळासाहेब पठारे, राहुल दळवी, आशिष माने, रवींद्र पठारे, मनोज पाचपुते, बाबासाहेब गलांडे, पप्पू गरूड, सदाशिव गायकवाड, किरण खैरे, सोमनाथ साबळे, राहुल पठारे, नितीन मेमाणे, बापू पठारे देवकुमार, बबन पठारे, संतोष दरेकर, मोहित फराटे ,निखिल भटवाल,बाळासाहेब विष्णू पठारे,विनोद पठारे, शोभा चव्हाण, पुष्पा पताले, निर्मला यादव, अंजना निकम, प्रसाद पठारे, अरविंद राजगुरू, मधुकर पठारे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
पठारे म्हणाले की, यापूर्वी वडगाव शेरीसह खराडी भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येत होती. त्यामुळे जनतेचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने आंदोलनाच्या माध्यमातून असलेला पाणीप्रश्न लष्कर, बंडगार्डन व होळकर पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून पाणीप्रश्न सोडविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून यश आले. मात्र दिवसेंदिवस उपनगरात वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जनतेला या काळात देखील पाणीटंचाईस सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने जनतेचा असलेला मुख्य प्रश्न लक्षात घेऊन विधानसभेत या विरोधात आवाज उठविल्याने साडेचार वर्षांपूर्वी भामा आसखेड पाणी योजनेस शासनाच्या मार्फत मंजुरी देण्यात आली. मात्र सध्याच्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे गेल्या चार वर्षांपासून भामा आसखेड योजनेचे काम बंद असल्याने झोपी गेलेल्या या सरकारला जाग येणार केव्हा? असा संतप्त सवाल पठारे यांनी केला.
याबरोबरच हे काम त्वरित सुरू न झाल्यास पालिका आयुक्त, महापौर यांना घेराव व जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच जरी राज्यात पक्षाची सत्ता नसली तरी पण समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आपण वचनबद्ध असून नागरिकांनी देखील विकासकामासंदर्भात काही समस्या असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पठारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेंद्र पठारे यांनी मानले.