भारत,पाकिस्तान चाहत्यांसाठी ‘सुपर संडे’

0

मुंबई। भाभारत -पाकिस्तान याच्या कोणत्याही खेळातील सामना असला म्हणजे चाहत्याची कमी नसतो.त्यामध्ये जिकणे यालाच महत्व असतो.आणि आज रविवार दोन्ही देशाच्या चाहत्यासाठी ‘सुपर संडे ’ आहे.भारताचा राष्ट्रीय खेळा हॉकी असून या हॉकी लिंगच्या उपात्या सामन्यात पाकिस्तान बरोबर सामना रंगणार आहे.तर दुसरा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी आहे.तोही चॅम्पियन ट्रॉफीमधील अंतिम सामना आहे.यामुळे दोन्ही सामने दोन्ही देशाच्या समर्थकासाठी महत्वाचे आहे.क्रिकेटमध्ये भारताला पाक कडून अतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.त्याचा वचपा काढण्याची संधी आहे.तसेच भारत चॅम्पियन ट्रॉफीचा गत विजेंता संघ आहे.त्यामुळे हि पुन्हा चॅम्पियन ट्रॉफी जिकण्याची सुवर्ण संधी भारताला आहेे . भारत -पाक संघ 10 वर्षानी आमने सामने आले आहे.त्यामुळे या सामन्याकडे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

आज चँपियन्स ट्राफी मध्ये लंडनच्या लॉर्डस मैदानावर भारत व पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होत आहेच पण याच दिवशी वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य सामन्यातही भारत पाक टीम आमने सामने येणार आहे. क्रिकेट सामना दुपारी तीन वाजता सुरू राहील तर हॉकी सामना सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हॉकी लीगमध्ये भारताने स्कॉटलंडला हरवून उपांत्यफेरी गाठली आहे. भारताने गेल्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिकली आहे.मात्र पाकिस्तान पह्ल्यिांद चॅम्पियन ट्रॉफीच्या अतिम फेरी दाखल झाली आहे.तो ही मुकाबला भारता बरोबर आहे. यापूर्वी आयसीसीच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत -पाकिस्तान संघ समोरा-समोर आले होते. यावेळी विश्वचषकातील विक्रम अबाधित ठेवत भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता.

पाकवर विजय म्हणजे गंगेत स्नान
चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारताचा सामना फायनलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारताचा माजी क्रिकेटर आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धूने भारतीय संघाला या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.इंग्लडच्या भूमीवर टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये ‘महायुद्ध’ होणार आहे. नवज्योतसिंग सिद्धूने याबाबत बोलताना पाकिस्तानच्या विरूद्ध विजय म्हणजे गंगेमध्ये स्नान केल्या सारखे आहे. सगळे पाप धुवून निघतात असे म्हटले आहे. तसेच भारताच्या विजयासाठी मी प्रार्थना करतो, असे म्हणत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.