भारताचा श्रीकांत उपांत्य फेरीत

0

सिडनी । ऑ स्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताचा युवा बॅडमिटनपटू किदम्बी श्रीकांत याने उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच साई प्रणीतला पराभूत करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. श्रीकांत व साईमध्ये 45 मिनिटांचा सामना रंगला.या सामन्यात प्रणीतचा 25-23, 21-17 अशा सरळ सेटमध्ये पराभव झाला.तर महिलांच्या सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक बॅडमिंटनमधील अव्वल मानांकित चीनच्या ताई झु यिंगने सिंधूला 10-21, 22-20, 21-16 असे पराभूत केले.

श्रीकांतने दमदार कामगिरीच्या जोरावर साई प्रणीतचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आणला आणि उपांत्यफेरी गाठली. उपांत्यपूर्व सामन्यातील पहिल्या सेटमध्ये दोन्ही भारतीयांनी दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र गेम पॉईंटमध्ये रंगलेला पहिला सेट श्रीकांतने 25-23 असा खिशात घातला. पहिला सेट जिंकल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये आत्मविश्वास दुणावलेल्या श्रीकांतने 21-17 अशी खेळी करत सामन्यात बाजी मारली.

दोन्ही भारतीयांची दमदार खेळी
ऑस्ट्रेलियन स्पर्धेत पहिला सेट श्रीकांत जिकला.पहिला सेट गमावलेल्या प्रणीतने दुसर्‍या सेटमध्ये जबरदस्त वापसी केली. 6-9 असा गुणफरक असताना प्रणीतने सलग तीन गुण मिळवून सेट 9-9 असा बरोबरीत आणला होता. मात्र त्यानंतर ब्रेक पॉईंटमध्ये 11-9 अशी आगेकूच करत श्रीकांतने पुन्हा आघाडी घेतली. श्रीकांतने 10-12 अशी आघाडी घेतली असताना प्रणीतनं पुन्हा 16-16 अशी बरोबरी साधली.

पी. व्ही. सिंधू पराभूत
ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या पी.व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक बॅडमिंटनमधील अव्वल मानांकित चीनच्या ताई झु यिंगने सिंधूला 10-21, 22-20, 21-16 असे पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीच्या सेटमध्ये सिंधूने पहिला पॉईंट घेत दमदार सुरुवात केली. पहिला सेट सिंधूने 21-10 असा जिंकला.

दुसर्‍या सेटमध्ये ताई झु यिंग दमदार वापसी केली. या दोघींनी दमदार खेळी करत सेट ब्रेक पाईंटमध्ये नेला. अखेर 22-20 असा हा सेट जिंकत ताईने सिंधूशी बरोबरी साधली. तिसर्‍या सेटमध्ये सिंधू सेट जिंकून ताईला पराभूत करेल असे दिसत असतांना ताईने सर्वोत्तम खेळ करित 21-16 अशा फरकाने सिंधूला पराभूत केले.