भारताची एक इंच जमीन घेण्याची कोणाची हिंमत नाही: राजनाथसिंहांचा इशारा

0

लुकुंग: गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत महिन्याभरापूर्वी रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात २० पेक्षा अधिक भारतीय सैनिक शहीद झालेत. ४० पेक्षा अधिक चीनी सैनिकही ठार झालेत. यानंतर सीमेवरील तणाव वाढले. तणावाची परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह आणि लडाख दौरा करत सैनिकांचे मनोबल वाढविले होते. त्यानंतर आज शुक्रवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतीय सैनिकांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढविले.

भारताची एक इंचही जमीन घेण्याची हिंमत जगातील कोणत्याही देशात नाही. तसे प्रयत्न कोणी करू नये, अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागेल या शब्दात राजनाथसिंह यांनी चीनला इशारा दिला आहे.

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. आजपर्यंत जेवढी चर्चा झाली त्यावरून प्रश्न सुटले पाहजे आहे. परंतु कधीपर्यंत प्रश्न सुटतील हे निश्चित सांगता येणार नाही असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सैनिकांना मिठाई देखील भरविली.