भारताच्या महासत्तेचे श्रेय संविधानाला द्यावे

0

तळेगाव ढमढेरे । भारतासमोर अनेक आव्हाने उभी राहिली असून त्यातून मार्ग काढण्याचे काम शासनव्यवस्थेकडून केले जाते. भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचे श्रेय भारताच्या संविधानास द्यावे लागेल. संविधानिक तरतुदीमुळे भारत एकसंघ राष्ट्र राहिले आहे, असे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांनी व्यक्त केले.शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे विद्यालयात राज्यशास्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील, महेश ढमढेरे व प्राचार्य पाटील यांच्या हस्ते भारताचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ?राज्यशास्र विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय वाबळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात राज्यघटनेच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानबाबत सखोल माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पद्माकर गोरे यांनी केले तर, प्रा. विवेक खाबडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नामदेव भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. तसेच याच विद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.