भारतातील ईव्हीएम मशीनची ऑस्ट्रेलियाला भुरळ

0

दिल्ली: भारत देशातील विरोधी पक्ष ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करीत असतांनाच,ऑस्ट्रेलियाला मात्र या ईव्हीएममशीनने भुरळ घातली आहे. ऑस्ट्रेलियाचे भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी या यंत्रणेच कौतुक केले आहे. तसेच सिद्धू यांनी भारतातील निवडणूक आयोगाचे कौतुक केले. जर या लोकसभेच्या निवडणुकीला ईव्हीएमप्रमाणेच बॅलेटपेपर वर निवडणुका घेतल्या असत्या,बॅलेट पेपर वर पण प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

भारतातील निवडणूक प्रकीयेचे कौतुक करताना, देशातील इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान घेण्याची व्यवस्था कशी होऊ शकते? यासाठी सुव्यस्थित निवडणूक आयोग आणि अधिकारी हे या मागचे एकमेव उत्तर आहे. असे हरिंदर सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम मशीनमुळे मी प्रभावित झालो आहे,ऑस्ट्रेलियामध्ये मतदानावेळी असे होत नाही, माझ्या मते बॅलेट पेपरवरची जी व्यवस्था आहे, त्या वरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात, असे सांगत व्हीव्हीपॅट सिस्टिम चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.