सिल्वरस्टोन : भारतातील बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला व्यासायिक विजय मल्याने भारतात आठवण येण्यासारखं काही नसल्याचं वक्तव्य केले आहे. भारताची आठवण येते का?, अशी विचारणा केल्यावर विजय माल्या यांनी आठवण येण्यासारखं भारतात काहीही नसल्याचे सांगितले. बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन परतफेड न करता परदेशात पळून गेलेला मल्या परदेशात ऐशो-आरामचे जीवन जगत आहे. मोदी सरकार त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न करत आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या भारत क्रिकेट सामना दरम्यान, मल्या समोर आला होता. बुधवारी फॉर्म्यूला वन के प्रमोशनल कार्यक्रममध्ये माल्याने हजेरी लावली. यावेळी, भारतात आठवण काढण्यासारखे काहीच नाही आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य इंग्लंडमध्ये राहतात आणि काही अमेरिकामध्ये राहतात. भारतात कोणीच राहत नाही. माझ्या सावत्र बहिण-भावांचा प्रश्न राहिला तर, ते सर्व युकेचे नागरिक आहेत. कुटुंबाच्या दृष्टीने आठवण काढण्यासाठी काहीच नाही. माल्याने हेही सांगितले की, मी काहीही चूकीचे केले नाही. मी तर खूश आहे की, प्रकरण युके कोर्टात सुरू आहे, जिथे पक्षपात होत नाही. आता मी काय निर्णय लागतो, त्याची वाट पाहत आहे. लंडनमधील वातावरण मला आवडते. रोज मी माझ्या मित्रांना भेटतो आणि मजा करतो, असे सांगत माल्या बँकांचे पैसे बुडवून सध्या सुखात आणि मजेत आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट केले.