भारतात बनलेली असॉल्ट रायफल फेल

0

नवी दिल्ली । भारतात बनलेली नवी असॉल्ट रायफल परीक्षणात सदोष ठरली आहे. या रायफलची निर्मिती पश्चिम बंगालच्या इछापूर मधील रायफल फॅक्ट्रीत झाली होती. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्‍या प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम (झचढ)ने या रायफलच्या नमुन्यात अनेक दोष सांगितले आहेत. याच्या डिझाइनमध्ये आणखी सुधारणेची गरज असल्याचेही म्हटले आहे.

सिक्युरिटी फोर्सेसनी मागितली नवी असॉल्ट रायफल…
सिक्युरिटी फोर्सेसनी मागच्या वर्षात 1 लाख 85 हजार नव्या असॉल्ट रायफलची मागणी केली होती. वास्तविक, लष्कर 5.56 कॅलिबर रायफलला हटवण्यावर विचार करत आहे.

5.56 कॅलिबर रायफलने शत्रूला फक्त जखमी करता येते. शत्रूचा खात्मा करण्यासाठी आम्ही असॉल्ट रायफलची मागणी केली होती. यानंतर जवळजवळ 20 कंपन्यांनी रायफल निर्मितीचे प्रस्ताव पाठवले. इछापूर स्थित कारखान्याला नवी असॉल्ट बनवण्याचे काम देण्यात आले. मागच्या आठवड्यात झालेले रायफलचे परीक्षण फेल राहिले.
एस. के. चॅटर्जी, ब्रिगेडिअर