वाशिंग्टन: भारत आपल्या वस्तूवर आकारत असलेला आयात शुल्क कमी करावा यासाठी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केले आहे. अमेरिकेचा विरोध असतांना भारताने आयात शुल्कात वाढ करणे हे योग्य नसून शुल्क धोरण रद्द व्हायला पाहिजे असे ट्रम्प यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
या बाबत आपण लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयात शुल्क धोरणाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षापासून भारत देश अमेरिकेवर मोठ्या प्रमाणत आयात शुल्क आकारत असून,आता पुन्हा या शुल्कात वाढ केली असल्याचे दिसत आहे. हे आयात धोरण मुळीच स्वीकारार्ह नसून ते रद्द केलेच पाहिजे अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.
ऑक्टोबर महिन्यातही ट्रम्प यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. या वाढलेल्या शुल्काविषयी मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी या शुल्कात कपात करण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे ट्रम्प म्हणाले होते.