भारताने मालिकाही जिंकली

0

बंगळूरू । भारत आणि इंग्लंडमध्ये तीन टी-20 सामन्याच्या मालिकेतील अंतिम व निर्णायक सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी 203 धावांचे आव्हान दिले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंगच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने 202 धावांचा टप्पा पार केला. रैनाने 63, धोनीने 56 तर युवराजने 27 धावांची खेळी केली.
चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंगच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने 202 धावांचा टप्पा पार केला. रैनाने 63, धोनीने 56 तर युवराजने 27 धावांची खेळी केली. लोकेश राहुलनेही सलामीला येत 22 धावा फटकावल्या. हार्दिक पांड्या 11 धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहली मात्र दोनच धावांवर धावचीत झाला होता. पदार्पणातच ऋषभ पंतने नाबाद 6  धावा केल्या.

विराटच्या बादने भारताला पहिला धक्का
आजच्या सामन्यासाठी प्रसिद्ध यष्टिरक्षक व स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रिषभ पंत याचा या सामन्यासाठी संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात पदार्पण करणारा पंत सर्वांत तरुण भारतीय खेळाडू आहे. पंत याचे वय 19 वर्षे 120 दिवस इतके आहे. याआधी ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात भारताकडून सर्वांत कमी वयात पदार्पण करण्याचा मान जलदगती गोलंदाज इशांत शर्मा याच्या नावावर होता. इशांत याचे वय पदार्पणावेळी 19 वर्षे 152 दिवस इतके होते.
203 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवातही खराब झाली. दुस-याच षटकात फिरकीपटू चहलने इंग्लंडचा सलामीवीर एस बिलिंग्सला भोपळाही फोडू न देता रैनाकरवी झेलबाद केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने जेसन रॉयच्या साथीने भारताच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला. रॉय मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. त्याच्याजागी आलेल्या मॉर्गन आणि रूट जोडीने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, एकाच षटकात मॉर्गन आणि रूटला बाद करत चहलने इंग्लंडचं कंबरडं मोडलं.

इंग्लंडची ऑल आउट
पहिल्या गोलंदाजीत याप्रमाणे जॉन्सन रॉयचे 32 रन, सॅम बिलींग-0, जोई रूट 42, मार्जनचे 40, बेन स्टोक 0, मोईन अली 2, प्लंकेट 0, जॉर्डन, रशीद आणी यांनी कोणताही रन न करता बाद झाल्याने अवघ्या 174 रन मध्ये आपला गाशा गुडाळावा लागला आहे. या सामन्यात सर्वात जास्त यजवेंद्र चाहल यांनी बळी घेतले आहे. त्याने तब्बल 6 बळी घेतल्याने खळबळ उडाले आहे. त्याच्या पाठोपाट जसप्राईट बुमराह याने 3 बळी तर अमीत मिश्राने 1 बळी घेतल्यामुळे भारताचा विजय सहज
करण्यात आला.