भारताला 265 धावांचे लक्ष्य

0

बर्मिंगहॅम । चॅम्पियन ट्रॉफीच्या दुसर्‍या उपांत्य फेरीत नाणेफेक जिकून भारताने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेवून बांगलादेशाला फलंदाजीला निमंत्रण दिले.कर्णधार विराट कोहलीने घेतलेला निर्णय योग्य आहे.हे भुवनेश्‍वरने सिध्द केले.सामन्याच्या सुरवातीला वातावरणाचा फायदा भारतीय गोलंदाजानी घेतला.सलामीवीर सौम्य सरकार शुन्यावर भुवनेश्‍वर कुमारने त्रिफळा उडवून दिला. यानंतर आलेल्या सब्बीर रेहमानने थोडी फटकेबाजी करुन आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करित असतांनाच जलद धावा काढण्याच्या प्रयत्नात रविंद्र जाडेजाकडे झेल देत माघारी परतला.31 धावांवर 2 फलंदाज बाद अशी बांगलादेशची स्थिती झाली होती.तमिम आणि मुश्फिकुर या जोडीने बांगलादेशासाठी 123 धावांची भागीदारी करुन बांगलादेशला सुस्थितीत आणून ठेवले.अशात भारतीय गोलंदाजानी ही भागीदारी मोडून काढली.तमिन व मुश्फिकुर यानीच अर्धशतकी खेळी मात्र नंतर मोठी खेळी कोणीच करू शकले नाही.भारताकडून गोलंदाजी करतांना भुवनेश्‍वर कुमार ,जसपित बुमराह,केदार जधाव यांना प्रत्येकी 2 विकेट ,जडेजा याला 1 विकेट ,आर.अश्‍विन व हार्दिक पंड्या यांना कोणताही फलंदाज बाद करता आला नाही.

भागीदारी केदार जाधवने तोडली
भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सौम्य सरकारला शुन्यावर पहिल्याच ओव्हरमध्ये त्रिफळाचीत करून बांगलादेशाला पहिला झटका दिला. बांगलादेशाचा धावाफलक 31 वर असतांना शब्बीर रेहमानला 19 धावांवर भुवनेश्‍वर कुमारने झेलबाद केले.पहिले दोन बळी गेल्यानंतर तमिम आणि मुश्फिकुर या जोडीने बांगलादेशचा डाव सावरायला मदत केली. या दोघांनीही 123 धावांची भागीदारी तमीमने 70 धावा केल्या.पण केदारने 27.6 ओव्हरमध्ये त्याचा त्रिफळा उडवून भारताला मोठी भागीदारी तोडून महत्त्वाची विकेट मिळवून दिली.यानंतर कोणीच फलंदाज टिकू शकला नाही. शकिब अल हसन 15 धावांवर जडेजाच्या चेडूवर धोनीच्या हातात झेल दिला.अर्धशतक करणारा मुशाफिकूर रहिमही याला 61 धावांवर केदारच्या चेंडूवर विराटकडे झेल देऊन बाद झाला. 42.3 ओव्हरमध्ये त्याने मोसदेक हुसेन (15) आपल्याच चेंडूवर झेलबाद केले.44.6 ओव्हरमध्ये मोहमदुल्लाह याला 21 धावांवर बुमराहने त्रिफळा उडविला.तस्कीन अहमद 10 धावांवर तर कर्णधार मशरफे मुर्तजा हा 30 धावांवर नाबाद खेळत होता.बांगलादेश संघाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 264 धावा केल्या आहेत.

तमीमला मिळाले जीवदान
बांगलादेशाचा सलामिवीर 12.5 ओव्हरमध्ये तमीम इक्बालला एक जीवदानही मिळाले होते. जेव्हा पंड्याने नो बॉलवर त्याला बोल्ड केले तेव्हा त्याच्या फक्त 17 धावा झाल्या होत्या. हे जीवनदान मिळाल्यानंतर तमीम अर्धशतक झळकावले. तो 82 चेंडूंत 70 धावा करून बाद झाला. यात 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. यामुळे बांगलादेश सुस्थीत आला. यानंतर मुशाफिकूर रहिमनेही 61 धावांचे टीमच्या धावसंख्येत योगदान दिले.