भारतासाठी चिंगलसेनाचा निर्णायक गोल

0

आम्सटलवेन । चिंगलसेनाच्या निर्णाक गोलाच्या जोरावर रोमहर्षक लढतीत भारताने ऑस्ट्रियाचा 4-3 असा पराभव करत आपल्या युरोप दौर्‍याचा शेेवट गोड केला. चिंगलसेना आणि रमणदीप सिंगने केलेले प्रत्येकी दोन गोल हे भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले, रमणदीपने संघाच्या गोलांचे खाते खोलताना 25 व्या आणि 32 व्या मिनिटाला गोल केले. तर चिंगलसेनाने 37 व्या आिेण 60 व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. ऑस्ट्रियाकडून ऑलिव्हर बिंडर (14 व्या मिनीटाला) मायकल कॉर्पेर (53 व्या) आणि पॅट्रिक एसने (55 व्या) गोल करत सामन्यात चुरस निर्माण केली. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडला सलग दोन सामन्यांमध्ये हरवणार्‍या भारताने ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात धिमी सुरूवात केली. चेंडूवर ताबा मिळवून भारतीय खेळाडूंना सुरूवातीला सर्कलच्या आत जाऊन आक्रमण करता आले नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये ऑलिव्हर बिंडेरने 14 व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रियाला 1-0 आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी सुरूवातीच्या खेळात केलेल्या चुका टाळल्या. या क्वार्टरमध्ये 25 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करताना अमित रोहिदासकडून मिळालेल्या पासवर रमणदीपने कुठली चूक केली नाही. मध्यंतरानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. त्यात रमणदीपने 23 व्या मिनीटाला मैदानी गोल करत भारताला 2-1 अशी आघडी मिळवून दिली.

भारतीय आक्रमक
दुसर्‍या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी सुरूवातीच्या खेळात केलेल्या चुका टाळल्या. या क्वार्टरमध्ये 25 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करताना अमित रोहिदासकडून मिळालेल्या पासवर रमणदीपने कुठली चूक केली नाही. मध्यंतरानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. त्यात रमणदीपने 23 व्या मिनीटाला मैदानी गोल करत भारताला 2-1 अशी आघडी मिळवून दिली. या आघाडीनंतर मनदीप सिंगने मिळवलेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताला आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली होती. पण यावेळी चेंडू गोलपोस्टच्या क्रॉसबारवर आदळल्याने ही संधी वाया गेली. त्यानंतर मनदीपने मिळवलेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर चिंगलसेनाने 37 व्या मिनीटाला गोल करत संघाची आघाडी 3-1 अशी वाढवली. शेवटच्या क्वार्टरमध्ये कॉर्पेरने 53 व्या मिनीटाला केलेल्या गोलामुळे ऑस्ट्रियाच्या संघाने सामन्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला.

सामना संपायला आठ मिनिटांचा अवधी असताना ललित उपाध्यायला गोल करण्याची संधी मिळाली होती, पण ऑस्ट्रियाच्या गोलरक्षकाने त्याचा हा प्रयत्न फोल ठरवला. या दरम्यान पॅट्रिकने 55 व्या मिनीटाला गोल करत ऑस्ट्रियाला सामन्यात 3-3 अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करण्यासाठी भारताने जोरदार आक्रमक खेळ केला. सामना संपायची शिटी वाजायच्याआधी चिंगलसेनाने रमणदीपने गुरजंतसिंगद्वारे दिलेल्या पासवर गोल करत निर्णायक गोल करत भारताला विजय मिळवून दिला.