रावेर- शहरातील समर्थ हॉस्पिटलचे डॉ.भगवान कुयटे यांना नवी दिल्ली येथील भारतीय एकता परीषदेतर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या 6 ऑक्टोबर रोजी स्मृतीचिन्ह देऊन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अटवाडे येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ.कुयटे यांनी अर्थपॅडीक्स मध्ये एमबीबीएस केले आहे. त्यांचे रावेर शहरात समर्थ हॉस्पिटल असून वैद्यकीय सेवेसोबत समाज सेवेची सुध्दा त्यांना आवड आहे. प्रत्येक 21 तारखेला मोफत शिबिर, अपंगासाठी दरमहा मेडिकल्स कॅम्प, आदिवासी मुलांची मोफत आरोग्य तपासणी त्यांच्यातर्फे केली जाते. त्यांनी आतापर्यंत देश-प्रदेशात वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी 14 कॉन्फरन्स केल्याने त्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाला.