धुळे : देशभरात वाढती महागाई व वाढती बेरोजगारी च्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंची केद्र व राज्यसरकारच्या धोरणामुळे जनता महागाई चे आगीत होरपळत आहे. गॅस पेट्रोल, डिझेल भाव कमी करण्यात यावे, एसटीची भाडेवाढ कमी करावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे यावेळी वसत पाटील, अॅड. हिरालाल परदेशी, हिरालाल सापे, रमेश पारोळेकर, साहेबराव पाटील, पोपटराव चौधरी आदी उपस्थित होते.