मुंबई:- भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे 1 मे रोजी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मुंबई येथे मान्यवरांचा सत्कार सोहळा व महासंघाचा 29 वा कामगार मेळावा आयोजित करण्यात आलेला सदर कामगार मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री, मिलींद देवरा आणि इतर मान्यवर कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या कामगार मेळाव्यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरूद्ध तसेच कामगार कायदे बदलण्याचे कारस्थान, कंत्राटीकरण, अॅप्रेंटिसशीप व निश्चितकालीन रोजगाराच्या नावाखाली गुलामी लादण्याचा प्रयत्न सरकारचे खाजगीकरण धोरण आणि असंघटीत कामगारांना कामगार कायदे व सामाजिक सुरक्षा लागू होण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे क ामगार पिचून निघालेला आहे. सरकार आपल्या मर्जीनुसार कामगार धोरण राबवित असून त्यामुळे कामगार चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी अशा कामगार मेळाव्याची अत्यंत आवश्यकता आहे.
यावर्षी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), महाराष्ट्र राज्य कमिटीचे सेके्रटरी व ज्येष्ठ कामगार कॉम्रेड पी. आर. कृष्णन यांना “भीष्माचार्य”, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज क ामगार फेडरेशनचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते एस. डी. डांगे यांना “द्रोणाचार्य” पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहेत. तरी राज्यातील सर्व कामगारांनी बेरोजगारी वाढविणार्या व क ामगार विरोधी सरकारच्या धोरणांविरूद्ध पूर्ण ताकदीने या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन महासंघातर्फे केलेले आहे.