जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हा व महानगर जिल्ह्याच बैठक भाजपाचे नेते व मा.मंत्री आ.गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या अध्यक्षतेखाली जी.एम.फाउंडेशन येथे आयोजन करण्यात आली होती. बैठकीमध्ये चाळीसगाव चे आमदार मंगेश चौव्हाण यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण याविषयी ठराव मांडला. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष दादा पाटील यांनी मांडला. आमदार संजय सावकारे यांनी राजकीय ठराव मांडत असतांना आरक्षण व शेतकऱ्यांच्या, कामगारांचे प्रश्न याकडे लक्ष न देता दुसरीकडे लक्ष वेधण्याचे काम हे सरकार करत आहे असे म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे विभागीय संगठन मंत्री रविजी अनासपुरे यांनी पक्षाच्या आगामी कार्यक्रमची माहिती दिली.
१. लसीकरणाचे १००% पूर्ण करण्यासाठी जिल्हाभरात आरोग्य रक्षक काम करतील.
२. घरोघरी जाऊन १००% लसीकरण करून घ्यावे.
३. प्रत्येक गावात २६ नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करावा.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.स्मिता वाघ, जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील, माजी आमदार डॉ.डी.एस.पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, माजी जि.प. अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, डॉ.राजेंद्र फडके, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदु महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, के.बी. साळुंखे, पद्मकर महाजन, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, प्रदेश पदाधिकारी, त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक जळगाव महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी मांडले. तर सूत्र संचलन जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील व मधुकर काटे यांनी केले. आणि महानगर सरचिटणीस राजेंद्र घुगे पाटील यांनी आभार मानले.