भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

0

धरणगाव। येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजपा तालुका अध्यक्ष संजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कांतिलाल माळी व सरचिटणीसपदी सचिन पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

धरणगांव शहर, तालुका पदाधिकार्‍यांच्या झालेल्या बैठक भायुमोची पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीबद्दल मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून सदर नियुक्ती देत असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हाउपाध्यक्ष सचिन पाटील, सुभाष पाटील, शिरीष बयस, तालुकाध्यक्ष संजय महाजन, चंद्रशेखर पाटील, प्रकाश सोनवणे, पुनीलाल महाजन, शहराध्यक्ष सुनिल वाणी, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, भालचंद्र माळी, ललित येवले, गुलाब मराठे आदींनी अभिनंदन केले.

निवड प्रसंगी यांची होती उपस्थिती
यावेळी दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, दिलीप पाटील, भिमराज पाटील, प्रवीण महाजन, योगेश वाघ, किशोर माळी, विठोबा महाजन, भूषण पाटील, विशाल माळी, सुमित बडगुजर, राजेश हिरापुरे, अ‍ॅड.संदीप पाटील, अमोल महाजन, विक्की महाजन, मयूर महाजन, गोपाल बडगुजर, शुभम चौधरी, जितु महाजन, पंकज महाजन, जयेश बडगुजर, चेतन महाजन, सागर माळी, बंटी भोई, कुंदन पुरभे, मयूर बयस आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.