भारतीय दुतावासाच्या हस्तक्षेपानंतर मिकाची झाली सुटका

0

मुंबई : बॉलीवूडचा एनर्जेटिक गायक मिका सिंग याला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मिकाने भारतीय दुतावासाकडे मदत मागितली. आता मिकाची तुरुंगातून सुटका झाली आहे. एका १७ वर्षीय ब्राझिलिअन मॉडेलचा लैंगिक छळ केल्याचा आरोप मिकावर आहे.

आज मिका सिंगला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मॅाडेलने मिका सिंगवर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहावे लागेल.