मुंबई । नुकत्याच हाँगकाँग येथे पार पडलेल्या 20 वर्षे गटोतील मुलींच्या आशियाई रग्बी सेव्हन सीरिज स्पर्धेत भारतीय मुलींनी चौथे स्थान मिळवले. आशियातील बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना भारतीय मुलींनी सहापैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला. पहिल्या सामन्यात थायलंडने भारताला 36-0 असे हरवले. दुसर्या सामन्यात भारतीय संघाने विजयाच्या रुळावर गाडी आणताना मलेशियाचा 10-0 असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघाला चीनकडून 0-32 आणि हाँगकाँगकडून 0-39 असा पराभव पत्करावा लागला. या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाने सिंगापूरला 10-5 आणि उझबेकिस्तानला 22-15 असे हरवले.
भारतीय संघ : रुची शेट्टी (महाराष्ट्र), गार्गी वाळेकर ( महाराष्ट्र), निलम पाटील (महाराष्ट्र), रिआ बिष्ट (दिल्ली), रजनी सबर (ओदिशा), बसंती पंगी (ओदिशा), मंजुलता प्रधान (ओदिशा), कविता कस्तुरी (ओदिशा), चंदा ओरान (पश्चिम बंगाल), सुमन ओरान (पश्चिम बंगाल), पूनम ओरान (पश्चिम बंगाल).