भारतीय मुस्लिमांना मुस्लीम म्हणवण्यास लाज वाटायला हवी

0

नवी दिल्ली । अल-कायदाचा दहशतवादी झाकीर मुसा याने भारतीय मुसलमानांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतातील मुसलमान जगातील सर्वात निर्लज्ज मुसलमान आहेत. आया-बहिणींवर अत्याचार होत असताना ते इस्लाम शांतताप्रिय धर्म असल्याचे सांगत फिरत आहेत. स्वत:ला मुस्लीम म्हणवून घेताना त्यांना लाज वाटायला हवी, अशी गरळ त्याने ओकली आहे.

मुस्लीम महिलांवर अत्याचार होत असताना भारतीय मुस्लीम मात्र इस्लाम कसा शांतीप्रिय धर्म आहे हे सांगण्यात धन्यता मानत आहेत, असे तो म्हणतो. मुस्लिमांना चिथावणी देताना त्याने मागील काही घटनांचाही उल्लेख केला आहे. हिजबुल मुजाहिदीनपासून फारकत घेतलेला मुसा इस्लामी काश्मीरच्या स्थापनेसाठी कारवाया करत आहे. त्याच जिहादी विचारसरणीचा प्रचार करतानाची मुसाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यात मुसानं जिहादपासून दूर राहणार्‍या भारतीय मुस्लिमांवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय मुसाने दहशतवादी कारवायांमध्ये सामिल होण्यासाठी भारतीय मुस्लिमांना उकसवले आहे. गजवा ए हिंद साठी मुस्लिमांचा एक गट तयार करावा लागेल असे मुसाने सांगितले. या ऑडिओत मुसाने सांगितले की गोरक्शाच्या नावावर मुस्लिमांवर होणार्‍या हल्ल्यांमुळे माझे रक्त खवळून निघते. मुसाने हा ऑडिओ टेलिग्राम, व्हॉटसग्रुपवर ही व्हायरल केला आहे. मुसाने हुरियतच्या नेत्यांचे डोके उडवण्याची धमकी दिली आहे. याशिवाय सब्जार भटला मारण्यामध्ये मुसाचाच डाव होता हे आता उघड झाले आहे.

बिजनौरच्या धावत्या रेल्वेत एका पोलीस हवालदाराकडून मुस्लीम महिलेवर झालेली बलात्काराची घटना, कथित गोरक्षकांकडून मुस्लिमांना झालेली मारहाणाचे दाखले त्याने दिले आहेत. बहन, मैं शर्मिंदा हूँ और बहुत दुखी हूँ कि हम तुम्हारे लिए कुछ नहीं कर सके, असे मुसाने म्हटले आहे. हा आवाज मुसाचाच असल्याचे जम्मू काश्मीरच्या दोघा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. हा लढा काश्मीरसाठी नसून तो मुस्लीम आणि मुस्लीमेतर यांच्यातील असल्याचे मुसाने यात पुनरुच्चार केला आहे.

मुस्लीम समाजाची ताकद दाखवून द्या
अन्याय व अत्याचाराविरोधात बोलू न शकणारे आमच्या धर्माचे असूच शकत नाहीत. त्यासाठी मुसाने जंग ए बद्रचा हवाला देत सांगितले की ते ते फक्त 313 होते तरी त्यांनी जगावर राज्य केले. पैंगबर आणि त्यांच्या अनुयायांनी आपल्याला हेच शिकवले आहे का? त्यांनी युद्धात रक्त सांडले आणि आया-बहिणींच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. अजूनही वेळ गेलेली नाही. पुढे या. गोरक्षकांना इस्लाम व मुस्लीम समाजाची ताकद दाखवून द्या, अशी चिथावणीही त्याने दिली आहे.