भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव

0

लंडन । चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर नेहमी चुरस असणार्‍या भारत व पाकिस्तान संघात झाला. यात प्रथम नाणेफेक जिकून भारताने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेवून पाकिस्तानला फलंदाजीला निमंत्रण दिले. पाकने भारतासमोर विजयासाठी 339 धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले. याचा पाठलाग करतांना भारताचा संघ ढेपाळला. आजच्या सामन्यात सर्वच बाबतीत पाक संघ सरस ठरला.

पाकची उत्तम फलंदाजी
शोएब मलिक (12) भुवनेश्वर च्या 39 व्या षटकात बाद झाला त्यानंतर बाबर आझम(46) केदार जाधवच्या 42 व्या षटकातील 3 चेंडूवर युवराज सिंहने झेलबाद केले.मोहम्मद हफीज(57) व इमाद वसीम(25) यांनी धावसंख्या हलती ठेऊन 6.76 रन रेटने 338 च्या जवळ नेऊन ठेवली.

13-14 व्या ओवर मध्ये विराट कोहली बाहेर गेल्यानंतर धोनीने संघाची जबाबदारी घेतली पण पंड्या च्या गोलंदाजीत अझहर अली च्या पैड ला लागून बॉल उंच उडाला पण धोनीने रिव्यू नाही घेतला त्यानंतर कोहली पुन्हा मैदानात पुन्हा परतला.जूनला चॅम्पियन्स ट्रॉफी एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली, स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 4 जूनला पाकिस्तानविरुद्ध झाला. गतविजेत्या भारताने चॅम्पियन्सच्या थाटात खेळ करून पाकिस्तानवर 124 धावांनी मात केली. पण अंतिम सामन्यात पुन्हा पाकिस्तानने भारतासमोर विशाल धावांचे लक्ष्य ठेवले. याला पार करण्यात भारताला अपयश आले.

भारताची हाराकिरी
अंतिम सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 339 धावसंख्येचा पाटलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. रोहीत शर्मा, विराट कोहली या दोघांनाही मोहम्मद आमीरने झटपट बाद करुन भारताला धक्का दिला. शिखर आणि युवराज सिंहने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात ते दोघेही बाद झाले. यानंतर भरवशाचा महेंद्रसिंह धोनी काही खास कामगिरी करु शकला नाही. अवघ्या 4 धावा करत तो ही बाद झाला. यानंतर हार्दीक पांड्याने भारतासाठी विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. त्याने 7 व्या विकेटसाठी रविंद्र जाडेजासोबत 80 धावांची भागीदारी केली. या खेळीदरम्यान पांड्याने अर्धशतकी खेळीही केली. 76 धावांच्या खेळीत पांड्याने 4 चौकार आणि 6 षटकारही ठोकले. मात्र तो धावबाद झाल्यानंतर जडेजा, आश्‍विन, भुवनेश्‍वर आणि बुमराह हेदेखील काही विशेष करू शकले नाही.

अझहर अली व फखर जमान यांनी दमदार सुरवात करत पाकिस्तानला विशाल धावसंख्या उभारण्यास आणि भारतासमोर मोठे आव्हान उभे करायला सुरवात केली. अश्विन च्या 22 व्या ओवरच्या 6 व्या बॉलवर अझहर अली (59) धावचीत झाला आणि पहिला बळी मिळाला पण पाकिस्तानच्या फलंदाजांनी अजून आक्रमक होत खेळायला सुरवात केली. फखर जमानने (114) भारताविरुद्ध आपले पहिले शतक साजरे केले त्यानंतर पंड्या च्या गोलंदाजीचा शिकार झाला.

गोलंदाजही अपयशी
चँपीयन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या मर्यादा स्पष्टपणे उघड झाल्या. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीची काही षटकं भारतीय गोलंदाजांनी चांगली टाकली, ज्यात पाकिस्तानचे फलंदाज चाचपडताना दिसले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. या सामन्यात सर्वच गोलंदाजांनी निराशा केली. जलदगती गोलंदाजांनी प्रभाव न टाकल्यामुळे कोहलीने आठव्या षटकातच अश्विनला पाचारण केलं. मात्र याचा फरक पडला नाही. यानंतर रविंद्र जाडेजा, हार्दिक पंड्या यांनाही कोहलीने गोलंदाजीसाठी उतरवलं मात्र ही जोडी फोडण्यात त्यांनाही अपयश आलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि काही प्रमाणात हार्दिक पांड्याने किफायतशीर गोलंदाजी केली. भुवनेश्वरने आपल्या सुरुवातीच्या 5 षटकांमधली 2 षटकं निर्धाव टाकली होती. आपल्या गोलंदाजीत भुवनेश्वरने बाऊंसर्सचा भरणा ठेवला होता, ज्यामुळे त्याला जास्त मार पडला नाही. अखेर भुवनेश्वर कुमारनेच शोएब मलिकचा अडथळा दूर केला. हार्दिक पंड्याने फखार झमानचा महत्वपूर्ण बळी मिळवत 10 षटकांमध्ये 53 धावा दिल्या. मात्र अन्य सर्व गोलंदाज साफ अपयशी ठरले.
आजवर महत्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ नेहमीच सरस ठरत होता. विश्‍वचषकात तर भारताने पाकला एकही सामना जिंकू दिलेला नाही. तर चँपिअन्स ट्राफीच्या साखळी सामन्यातही भारताने पाकचा 124 धावांनी दारूण पराभव केला होता. अंतिम सामन्यासाठीही भारतच हॉट फेव्हरिट मानला जात होता. मात्र पाकने दमदार खेळ करत सर्व भाकिते उधळून लावली.

जमानला दोनदा जिवनदान
सलामी फलंदाज फखर जमान ला मिळालेल्या दोन जीवदानाचा फायदा उचलत त्याने आपल्या करियर मधील पहिले शतक झळकावले. फखर ने 106 चेंडूत 12 चौकार व 3 छक्कांच्या मदतीने 114 धावा बनवल्या.पाकिस्तानच्या सलामी जोडीने 128 धावा फलकावर लावल्या.भारताचे गोलंदाज अपयशी ठरले ,भुवनेश्वर सोडला तर कुठलाच गोलंदाज यशस्वी झाला नाही.भुवनेश्वर ने 2 षटके निर्धाव टाकले आणि 44 धावा देत शोएब मलिक (12)ला बाद केले.