नवी दिल्ली । भारतीय संघ कोठेही कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवत आहे.भारतीय संघाने 2016-17 या काळातील सत्रात भारतीय संघाची कामगीरी उल्लेखनीय आहे. भारताने या काळात 13 कसोटी सामन्यापैकी 10 सामन्यात विजय मिळविला आहे.भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी उंचावली आहे. न्यूझीलंड , इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया यांचा पराभव केला आहे.2015 मधील श्रीलंके विरूध्दच्या गाले कसोटीपासून भारतीय संघाचा एकाही कसोटीत पराभूत झाला नाही. असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला.
भारतीय संघात आज अनेक अष्टपैलू खेळाडू असल्याने भारतीय संघ संतुलित आहे. त्यामुळे भारतीय संघावर इतर संघ जळतात. अष्टपैलू खेळाडूसंघ भारतीय संघ शक्तीशाली आहे. सर्व स्थरावर भारतीय संघ वरचढ ठरत आहे.तो विषय गोलंदाजी, फलंदाजी असो त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघापेक्षा श्रेष्ठ ठरत आहे.भारतीय संघ परिपक्क झाला आहे. प्रत्येकांनी भारतीय संघाचा खेळ पाहिला असेल. सांघिक कामगिरीच्या जोरावर सध्या क्रमांक एकवर विराजमान आहे.अशी बोचरी टीका सचिनने प्रतिस्पर्धी संघावर केली आहे.
100 एमबी’ अॅपचे सचिनच्या हस्ते अनावरण
मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये काल ’100एमबी’ अॅपचे सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी तो बोलत होता. क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे ’स्फोट’ घडवून शतकांचे शतक करणारा सचिन ’मास्टर ब्लास्टर’ म्हणून प्रसिद्ध आहे. याच शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे घेऊन सचिनच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे असे नाव अॅपला देण्यात आले आहे. 27 मार्च रोजी या अॅपचा व्हिडिओ यू ट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओद्वारे सचिनने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला असून अॅपच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचे आवाहनही केले आहे. विराट-कोहली आणि स्मिथ यांच्या वादामुळे बॉर्डर-गावस्कर मालिका अधिक चर्चा झाली. दुसर्या कसोटीनंतर सुरु झालेला वाद अद्याप थांबलेला दिसत नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी तर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.